पुढील उताऱ्याचा अंदाजे एक-तृतीयांश शब्दांत सारांश लिहा. उताऱ्याला शीर्षक देऊ नये. सारांश मराठीत लिहा.
उत्तम श्रोता असणे हे समृद्ध जीवनशैलीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तरी पण आपल्यापैकी फार कमी लोक उत्तम श्रोते असतात. याचा अर्थ आपण वाईट असतो असे नाही, आपल्याला कुणी तसे शिकवलेले नसते. यासंदर्भातील खरे कारण असे आहे की, तसे फार कमी लोकांनी आपल्याला लक्षपूर्वक ऐकलेले आहे. परिणामतः आपण सामाजिक जीवनात ऐकण्यापेक्षा बोलण्यातच अधिक गुरफटलेले असतो. इतरांना भेटण्याची ओढ वाढत असते, पण त्यांचे ऐकण्यासाठी आपणाकडे वेळ नसतो. त्यामुळे मैत्रीचे रूपांतर हळूहळू स्वार्थात होत जाते. एखाद्या उत्तम श्रोत्याचा सहवास अत्यंत आनंददायक असतो. पण त्याच्याशी बोलतांना बहुदा आपण पुरेशा मोकळेपणाने व्यक्त होत नाही; त्यामुळे आपल्या बोलण्यात अस्पष्टता असते. त्यामुळे आपले बोलणे महत्त्वाचे असूनही दुर्लक्षित केले जाते. आपल्यावर कामाचा ताण असतो, किंवा आपल्या क्षेत्रात लौकिक प्राप्त करण्याची आपली आकांक्षा असते. किंवा आपणास नेमके काय हवे आहे. याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपली निकटची व्यक्ती संकटात असेल, कोणत्या तरी कारणाने आपण चिंताग्रस्त असू, आपले जीवन नैराश्याने व्यापलेले असेल अगर एखाद्यावेळी आपण अतिउत्साही असतो; सर्वत्र उर्जा भरलेली असते. पण त्या उत्साहामागील कारण आपणास माहित नसते.
वस्तुतः हे सारे सुस्पष्ट व्हायला ह्वे. एका उत्तम श्रोत्याला हे ज्ञात असते की; सुसंवादामुळे संभ्रमित, अतिउत्तेजित मनाला विकेंद्रित आणि शांत मनोवस्थेत नेता येते. सुसंवादाने आपले काय हरवले आहे याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो पण हे एऱ्हवी घडत नाही, त्यासाठी बोलण्यात सुस्पष्टता असणे आवश्यक असते. मात्र त्याबद्दल आपण पुरेसे सजग असत नाही. उत्तम श्रोत्यांची नेहमीच कमतरता असते, त्यामुळे लोक समोरच्याला समजून न घेता स्वतःच्याच म्हणण्यावर अडून राहतात. चिंता, अतिउत्साह किंवा अपेक्षांचे ओझे सोबत घेऊन वावरतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे गांभीर्यपूर्वक समजून घेत नाहीत. उत्तम श्रोता व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून सल्ला देतो आणि परिस्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न करीत असतो.
तो दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो, त्याला प्रोत्साहीत करतो. सहानुभाव व्यक्त करून त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या व्यक्तीच्या संभाषणाविषयी त्याने दाखविलेली आस्था व जिज्ञासा पाहून व्यक्ती विचारांच्या, भावनांच्या मूळापर्यंत जाण्यास प्रवृत्त होते. तो सांगू लागतो, “मला त्याबद्दल आणखी काही सांगा...” “जेव्हा तू असे म्हणालास ते ऐकून मी मंत्रमुग्ध झालो”, किंवा “तुला याक्षणी काय वाटले ?”, उत्तम श्रोत्याला हे माहीत असते की, अस्वस्थ स्थितीतील व्यक्तीच्या बोलण्यात संदिग्धता असणे ही एक सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे; आणि त्या अस्वस्थेचे निराकरण करणे चांगल्या सच्च्या मित्राचे दायित्व आहे. आपण नेहमी एखाद्या घटनेच्या अवतीभोवती घोटाळत असतो, तिच्या मूळापर्यंत जाण्याचा सहसा प्रयत्न करीत नाही. अशा परिस्थितीत उत्तम श्रोत्याच्या संभाषणाने व्यक्तीला त्या गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची प्रेरणा मिळते. आपणाला अशा व्यक्तीची गरज असते की, जो केवळ सल्ला देण्याऐवजी ‘पुढे चला’ अशा जादुई शब्दाची योजना करून प्रोत्साहीत करील. आपण नेहमी बहीण-भावाच्या नात्यासंबंधी बोलत असतो. त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्यांचे बालवयातील संबंध कसे असतील ? बदलत्याकाळानुसार त्यात कसकसे बदल होत गेले असतील ? यासंदर्भातील आपल्या चिंता आणि उत्सुकतेचे मूळ कशात आहे ? ते विचारतात, “त्या गोष्टीची तुम्हाला एवढी काळजी का वाटत असते?” किंवा “ती गोष्ट तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे?” त्यांना आमच्या भूतकाळच्या गोष्टी आठवत असाव्यात. त्यामुळे ते आमच्या भूतकाळातल्या गोष्टींचे दाखले देत असावेत. आणि असेही वाटते की, ते आमच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. संवादात संदिग्धता असल्याने सहजपणे आघात होण्याची शक्यता असते. आपण सहज म्हणतो, अमूक वस्तू सुंदर आहे. सुखद आणि त्रासदायक आहे. पण आपण असा विचार करीत नाही, आपणाला असे का जाणवले ? उत्तम श्रोता अशा सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मनाच्या तळाशी दडलेल्या भावनांची उकल करण्याचा प्रयत्न करीत असतो.
(510 शब्द)
60 marks · directive: Precis
The core of a good answer
The passage says good listeners are rare because few of us were ever listened to; a good listener calms a confused mind, encourages us with interest and simple prompts, and helps us reach the roots of our feelings.
An outline written by upsc.help, not an official UPSC answer; every fact checked by a separate review. How we work
What the question asks
The passage is printed as 510 words, so the summary should be about 170 words (one-third), in Marathi, with no title. Read twice, mark the main ideas, drop examples and quoted questions, and write a connected paragraph in your own words in the passage's order. Do not add opinions.
Answer outline
Introduction
Main ideas of the passage, in order (for planning; the summary itself must be in Marathi).
Paragraph 1
- Being a good listener is an important part of a rich life, yet few people are good listeners, not because they are bad but because no one taught them and few ever listened to them.
- So in social life we talk more than we listen; we want to meet people but have no time to hear them, and friendship slowly turns into self-interest.
- Because we rarely express ourselves openly, our speech is unclear and is ignored; work stress, ambition, worry, despair or unexplained excitement leave us unsure what we really want.
Paragraph 2
- All this needs to become clear: a good listener knows that good conversation can bring a confused, agitated mind to a calm state.
- Clarity in speech is needed, but we are not aware of it; because good listeners are scarce, people cling to their own view, carry anxieties and expectations and do not seriously understand others.
- A good listener hears carefully, advises and tries to change the situation.
Paragraph 3
- He understands others' feelings, encourages them with sympathy, and his interest and curiosity lead the speaker to the roots of thoughts and feelings.
- He knows that vagueness in a troubled person's speech is universal and that resolving it is the duty of a true friend; instead of only advising, he encourages with words like 'पुढे चला'.
- He asks why something matters so much, remembers our past, and tries to connect with us; since vague speech can easily hurt, he considers everything with sympathy and uncovers the feelings hidden deep in the mind.
Conclusion
Close the summary with the central point: a good listener, through sympathy and patient questions, helps others reach clarity about their own feelings.
Facts to remember
- Printed length: 510 words; one-third is about 170 words.
- Instructions: no title; summary in Marathi.